Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

शिवसेनेच्या संयत आणि संतुलित प्रचाराला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबहुत धन्यवाद

शिवसेनेच्या संयत आणि संतुलित प्रचाराला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबहुत धन्यवाद

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मतदारांना खुले पत्र

marathinews24.com

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा शिवसेनेचे उपनेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केला आहे. प्रचाराच्या समारोपानंतर त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील मतदारांना खुले पत्र लिहून आभार मानले आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध – सविस्तर बातमी 

या पत्रात सामंत यांनी स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीसाठी प्रयत्न झाले असले तरी, काही पक्षांच्या सत्ताकेंद्रित भूमिकेमुळे शिवसेनेने पुण्यात स्वतंत्र तर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. “शिवसेनेने आपली हिंदुत्ववादी विचारधारा आणि विकासाभिमुख भूमिका कायम ठेवत संयत आणि सकारात्मक प्रचार केला,” असे त्यांनी नमूद केले.

प्रचारादरम्यान शिवसेनेच्या तरुण आणि प्रामाणिक उमेदवारांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाल्याचे सांगताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा व रोड शोला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे त्याचेच द्योतक असल्याचे सामंत म्हणाले. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये शिवसेना निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे ही सांस्कृतिक राजधानी तसेच आयटी, उद्योग आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगून, आगामी काळात मेट्रो, विमानतळ, रिंग रोडसह पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी शुद्धीकरण यांसारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×