Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यातील तो बिबट्या अखेर जाळ्यात अडकला

पुण्यातील तो बिबट्या अखेर जाळ्यात अडकला

बेशुद्ध करून केले जेरबंद, वनविभागाच्या प्रयत्नांना आले यश

marathinews24.com

पुणे – शहरातील विमानतळ परिसरात एप्रिल २०२५ पासून वावरणार्‍या बिबट्या अखेर गुरूवारी (दि.११) मध्यरात्रीच्या सुमारास बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, मागील काही दिवसांपासून एआय द्वारे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओसह फोटोंना आता आळा बसणार आहे. संबंधित बिबट्याचा वावर विमानतळ परिसरात होता. अधूनमधून तो दिसून येत असल्यामुळे नागरिकही भीतीखाली होते. पुणे वनविभागाने अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद केले आहे.

पुण्यातील तो बिबट्या अखेर जाळ्यात अडकला

कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर डोळसपणे करा-डॉ. दीपक शिकारपूर – सविस्तर बातमी 

विमानतळ परिसरात असलेल्या लोकवस्ती परिसरात २५ एप्रिलला बिबट्या नागरिकांना दिसून आला होता. त्यानंतर बिबट्याने भूमीगत बोगदे, झाडी-झुडपांचा आसरा घेत ठिकाणे बदलली होती. त्यातच सोशल मीडियावर एआय चित्रफीत आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यापार्श्वभूमीवर वन विभागाच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, इंडियन एअरफोर्स, पुणे एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीने बिबट्याला पकडण्याची मोहिम हाती घेतली. त्यावेळी विमानतळाचा विस्तृत आणि संवेदनशील परिसरामुळे बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नांत अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, तरीही पथकांनी कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमर्‍यासह पिंजर्‍याद्वारे सातत्याने निरीक्षण ठेवले होते.

बिबट्या ४ डिसेंबरला पुन्हा भूमीगत बोगद्यात गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकांनी त्याचे बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले. अतिरिक्त लाईव्ह निरीक्षण करणारे कॅमेरे बसवून बोगद्याच्या आतील हालचाली अधिक अचूकपणे टिपल्या. त्या माहितीच्या आधारे ११ डिसेंबरला ३० जणांच्या संयुक्त पथकाने समन्वय साधून बिबट्याला ८० फूट लांबीच्या बोगद्यात नेले. त्याठिकाणी अत्यंत मर्यादित जागा असूनही, वन्यजीव वैद्यक तज्ञ डॉ. गौरव मंगला यांनी बिबट्याला यशस्वीपणे बेशुद्ध केले. त्याला बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय निरीक्षणासाठी हलवण्यात आले. ‘बिबट्या सध्या पूर्णपणे स्थिर असून पुढील निरीक्षणासाठी बावधनमधील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवले आहे. ही मोहिम वनसंरक्षक आशिष ठाकर, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक विशाल चव्हाण, सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपाल/वनरक्षक यांच्यासह नेहा पंचमिया रेस्क्यु टिमने पार पाडली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×