Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कायद्याच्या रक्षकानेच जमिनीच्या वादामध्ये दाखवली बंदूक

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

हिंजवडी जवळील कासारसाई येथील घटना

marathinews24.com

पिंपरी : जमिनीच्या वादातून एका वकिलाने बंदूक बाहेर काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वादातील जमीन पाहण्यासाठी आलेल्या वकिलाची जमीन मालकाने अडवणूक केल्यानंतर संबंधित वकिलाने चक्क बंदुकीचा धाक दाखवल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हिंजवडी जवळील कासारसाई येथे शुक्रवारी हा प्रकार घडला.

गावठी कट्टयासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना बेड्या – सविस्तर बातमी 

या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. बंदूक दाखवणाऱ्या वकिलांचे नाव संदीप भोईर असे आहे. ते धनंजय वाडकर यांचे वकील आहेत. कासारसाई येथील शब्बीर मुलानी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. मुलानी यांची काही जमीन वाडकरांनी खरेदी केली. मात्र ही जमीन कूळ कायद्यात मोडत असल्याने गेली १० ते १२ वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे.

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास वकील संदीप भोईर हे आपल्या साथीदारांसोबत कासारसाईत गेले. ते त्या वादातील जमिनीच्या ठिकाणी जात असताना मुलानी कुटुंबाने त्यांना अडवले. त्यांच्यात वाद झाले. मुलानी कुटुंबाने वकीलांसह त्याच्यासोबत आलेल्या सर्वांना हुसकावल्यानंतर ते सर्वजण आपल्या गाड्यांकडे पळताना व्हायरल व्हिडिओत दिसून येत आहे.

पळत असताना वकील भोईर यांनी कंबरेला अडकवलेले बंदूक बाहेर काढले. त्यामुळे मुलानी कुटुंब आक्रमक झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. वकील आणि त्यांच्या साथीदाराने तिथून पळ काढला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलिसी ठाण्यात बोलावले होते. या घटनेने पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी, जमिनीच्या वादातून होणारे वाद यामुळे निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×