आंदेकर टोळीच्या प्रतिस्पर्धी टोळीतील म्होरक्याचे उद्दातीकरण

आंदेकर टोळीच्या प्रतिस्पर्धी टोळीतील म्होरक्याचे उद्दातीकरण

नाना पेठेत पत्रके वाटल्याचा प्रकार; पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील नाना पेेठेतील आंदेकर टोळीच्या प्रतिस्पर्धी सूरज ठोंबरेचे उद्दात्तीकरण करणाऱ्या पत्रकांचे वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश रमेश मोरे, गौरव दिलीप कोठारी, प्रसाद दिलीप धायगुडे (तिघे रा. नानापेठ, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार शरद पाटील यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोहगावमध्ये डंपर चालकाने दुचाकीस्वार तरुणीला चिरडले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील भाजी मंडई परिसरात आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी सूरज ठोंबरे याचे उद्दात्तीकरण करणाऱ्या पत्रकांचे २६ मे रोजी वाटप करण्यात आले होते. शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता, तसेच नैतिकतेला धोका निर्माण होईल, अशा प्रकारचे चित्र, चिन्ह, फलक वा पत्रके सार्वजनिक ठिकाणी प्रसारित करणे असे आदेशात म्हटले आहे. आरोपींनी येरवडा कारागृहात असलेला गुंड सूरज ठोंबरे याचे उदात्तीकरण करणारे पत्रके छापली, तसेच २० ते २५ पत्रके वाटल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना नोटीस बजाविण्यात आली आहे.

नाना पेठेत बंडू आंदेकर टोळीची दहशत आहे. आंदेकर टोळीआणि सूरज ठोंबरे टोळीत वैमनस्य आहे. आंदेकर टोळीने नाना पेठेत ठोंबरे टोळीतील निखिल आखाडे याचा ऑक्टोबर २०२३ मध्ये खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून केला होता. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गायकवाड याच्यासह १६ जणांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×