Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

महिलेने टीप दिली अन गुंड घायवळ पळाला

महिलेने टीप दिली अन गुंड घायवळ पळाला

कुख्यात नीलेश घायवळचा जामखेडमधून पळाला

marathinews24.com

पुणे – महिलेने टीप दिल्यामुळे कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाउ सचिन घायवळ शेतातून पळून गेल्याची घटना जामखेड तालुक्यातील एका गावात नुकतीच घडली आहे. तो शेतात लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. मात्र, पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने शेतातून पळ काढला. दरम्यान, त्याला पळून जाण्यास मदत करणार्‍या महिलेसह तिचे कुटूंबिय पुणे पोलिसांच्या रडारवर आले आहे. तिला ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

पुण्यात नायजेरियन नागरिकाचा खून, दोघे ताब्यात – सविस्तर बातमी 

शिवणे भागातील नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ, वाहतूक सेवा पुरविणार्‍या खासगी कंपनीतील संचालक महिलेकडून कुख्यात गुंड नीलेश घायवळसह भाउ सचिन घायवळ याने ४४ लाख ३६ हजारांची खंडणी उकळली होती. याप्रकरणी १३ जणांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बापू कदम, नीलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलू गोळेकर, बबलू सुरवसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यानंतर पोलिसांनी सचिन घायवळ याच्यावर मोक्का कारवाई केली. तेव्हापासून तो पुण्यातून फरार झाला आहे.

गुंड सचिन जामखेड तालुक्यातील गावातील शेतात लपून बसल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथक त्याच्या मागावर जामखेडमध्ये दाखल झाले होते. मात्र, संबंधित गावातील महिलेने सचिनला पोलिस पकडण्यासाठी आल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याने शेतातून पलायन केले. त्यामुळे पोलिसांनी सचिनला टिप देणार्‍या महिलेकडे मोर्चा वळविला आहे. तिला ताब्यात घेऊन पोलिस तिची कसून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, नीलेश घायवळ अजूनही विदेशात असून, तो ब्रिटनमध्ये राहत असल्याची माहिती आहे. कोथरुड गोळीबार प्रकरणात तो फरार असून, त्याच्यावर बनावट पासपोर्टप्रकरणी गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने त्याला फरारी घोषीत केले आहे. निलेशच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×