‘झेप’ बंगल्याची संरक्षित भिंत पुन्हा बांधली

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर बिल्डरला आली जाग

marathinews24.com

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, दिवंगत साहित्यिक ना. स. इनामदार यांच्या मुकुंदनगरमधील ‘झेप’ बंगल्याची तोडलेली संरक्षित भिंत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर बांधकाम व्यावसायिकाने शनिवारी पुन्हा बांधून दिली.

भावभावना, कल्पनांचे रंग लाभल्यास उत्तम लिखाण घडते – सविस्तर बातमी

बांधकाम व्यावसायिकाने ३१ ऑक्टोबर रोजी पूर्वसूचना न देता बंगल्याची संरक्षित भिंत पाडून लोखंडी गेट तोडले होते. तसेच बंगल्याचे नुकसान करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. इनामदार यांचे जावई सुभाषचंद्र गोपाळराव आरोळे (वय ८०, रा. झेप बंगला, ४२७/ ७८, टिमवी कॉलनी, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक आणि जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पुन्हा या सीमाभिंतीचे बांधकाम करवून घेण्यात आले.

इनामदार यांच्या मृत्यूपश्चात आरोळे कुटुंब याठिकाणी राहण्यास आहे. बांधकाम व्यावसायिक आणि आरोळे यांच्यामध्ये खरेदीखत झाले आहे. आरोळे यांनी कागदोपत्री साडेसात कोटी रुपयांना हा बंगला विकला. खरेदीखत झाल्यानंतर तीन महिन्यांत ताबा देण्याचे ठरले. आरोळे यांनी खरेदीखताविषयी आक्षेप घेतले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

साहित्यिक ना. स. इनामदार यांनी पेशवाईतील सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या जीवनावर आधारित ‘झेप’ ही कादंबरी लिहिली. त्यांच्या या पहिल्याच कादंबरीने साहित्य विश्वात अनोखे स्थान निर्माण केले. त्यापाठोपाठ शहेनशाह, मंत्रावेगळा, राऊ अशा त्यांच्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या रसिकांच्या पसंतीस उतरल्या. इनामदार यांचे ६ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले. त्यानंतर, त्यांचे जावई सुभाषचंद्र आरोळे हे त्यांच्या बंगल्यात वास्तव्याला आहेत. पहिल्याच ‘झेप’ कांदबरीने नावलौकिक मिळाल्यामुळे इनामदार यांनी बंगल्याचे नामकरण ‘झेप’ असे केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×