फोफावलेल्या लाचखोरीला लगाम लागेना…

शिक्षण उपनिरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक सुसाट

marathinews24.com

पुणे – शासकीय सेवेतील चांगला पगार सोई-सुविधांचा लाभ उठवित उच्चपदस्थ अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांमध्ये असलेली लाचखोरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी कार्यालयात नियमबद्ध असलेल्या कामांनाही जाणूनबुजून आडकाठी आणून संबंधिताकडून सर्वसामान्यांकडून लाच उकळली जात आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस, शिक्षण विभाग, लिपीकासह खासगी व्यक्तींनी लाच घेतली आहे. त्यामुळे लाच दिली नाही तर कामात अडथळा, दिली तरच कामे होत असल्यामुळे नागरिकांची आर्थिंक ससेहोलपाट वाढत चालली आहे. फोफावलेल्या लाचखोरीने सर्वांनाच वेठीस धरले जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याठी धनंजय मुंडेना सहआरोपी करा – मनोज जरांगे – सविस्तर बातमी

सरकारी कार्यालयातील नागरिकांची विविध कामे मार्गी लावून देण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून लाच स्वीकारुन पदाला बट्टा लावला आहे. दिवसेंदिवस वरिष्ठ अधिकार्‍यांपासून कनिष्ठापर्यंत लाचेचा आलेख वाढत असल्याचे दिसून आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा कार्यालयाच्या परिक्षेत्रात २०२५ मध्ये कारवाईचा आलेख वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने पोलीस, शिक्षण विभाग, महसूल, महापालिका यासह महत्वाच्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाचखोरांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषतः पुण्यात मागील काही दिवसांत पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, शिक्षण विभागातील शिक्षण उपनिरीक्षकाविरूद्ध कारवाई केली आहे. दरम्यान, वाढत चाललेल्या लाचखोरीमुळे तक्रारदारासह सर्वसामान्यांच्या कामातही अनेक अडथळा निर्माण होत आहेत.

लाचखोर शिक्षण उपनिरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक

पुण्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षकाला केबीनमध्येच १ लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. रावसाहेब मिरगणे (वय ५६) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई २५ नोव्हेंबरला केली आहे. वर्षानुवर्षे मोफत शिक्षणाची बाराखडी शिकवणार्‍या महिला शिक्षेकच्या पतीनकडून आरोपी मिरगणेने लाच स्वीकारली आहे. शालार्थ आयडी’ मंजूर करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेतली आहे. आरोपीविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. तसेच काही दिवसांपुर्वी एसीबीच्या पथकाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल ४६ लाख ५० हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकवले. प्रमोद रविंद्र चिंतामणी ( वय ४४, रा. ५०४, सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी, मुळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या आशिलाला मदत करण्यासाठी तसेच जामिन अर्जावर पोलीस उत्तर (से ) दाखल करण्यासाठी चिंतामणीने २ लाखांची मागणी केली होती.

सरकारी कार्यालयात किरकोळ कारणांमुळे विविध कामांना आडकाठी निर्माण होते. नेमकी तीच संधी साधून संबंधित विभागातील कर्मचार्‍यापासून ते कामाच्या स्वरूपानुसार अधिकार्‍यांकडून लाचेच्या स्वरूपातील सावज हेरले जाते. त्यानंतर अमुक-तमूक किंमत ठरवून ते त्रयस्थाच्यावतीने काम मार्गी लावले जात आहे. मात्र, कामाच्या बदल्यात दाम घेणार्‍या काही लाचखोरांमुळे संपुर्ण विभागातील अधिकारी -कर्मचार्‍यांना बट्टा लागला जात आहे. प्रामुख्याने सेवानिवृत्तीची काही वर्ष बाकी असलेल्या आणि निर्ढावलेल्या लाचखोरांकडून सर्वसामान्यांच्या कामात सातत्याने हस्तक्षेप केली जात आहे. पोलीस अमलारांपासून ते उपनिरीक्षकांपर्यंत आणि शिक्षण उपनिरीक्षकाने रान पोखरले आहे. त्यामुळे अशा लाचखोर अधिकारी कर्मचार्‍यांविरूद्ध होणारी तगलादू निलंबनाची कारवाईही गंभीर विषय आहे.

पुण्यात नोव्हेंबरमधील चर्चेतील लाचखोरी

मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणार्‍या वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला एसीबीने नुकतेच पकडले आहे. परमेश्वर माणिक पाखरे (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तर थकीत वेतन मिळवून देण्यासाठी लाच घेणार्‍या इंदापुरातील ओैद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील लिपिकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. अनमोल शिवाजी शिंगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील वेतन थकीत असल्याने वसतिगृह अधिक्षकांनी लिपिक शिंगे याची भेट घेतली. थकित वेतन मिळवून देण्याची विनंती केली. वेतन मंजुरीसाठी शिंगे याने तीन हजार रुपयांची लाच घेतली.

लाचलुचपत विभागाकडे करा तक्रार

शासकीय कार्यालयासह निमशासकीय कार्यालयात काही जणांकडून लाचेची मागणी केली जाते. मात्र, कोणत्याही कामासाठी रक्कम न देता नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. संबंधित तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेउन लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात येते. त्यामुळे लाचेची मागणी करणार्‍यांची तक्रार एसीबी विभागाकडे करावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×