Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूकीचा तिढा सुटला

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूकीचा तिढा सुटला

पोलीस आयुक्तांची मध्यस्थी यशस्वी

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाची वैभवशाली पंरपरा असलेल्या पुणे शहरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकीच्या वेळेवरून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मध्यस्थीने शहरातील नावाजलेले भाउ रंगारी आणि मंडई गणपती मंडळाकडून पोलिसांच्या विनंतीला मान दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणेच यंदाही दोन्ही मंडळे आपआपल्या वेळेनुसार विसर्जन मिरवूणकीत सहभागी होणार आहेत. याबाबत भाऊ रंगारी उत्सव प्रमुख पुनीत बालन, मंडई गणपती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांची पोलीस आयुक्तांसोबत गुरूवारी (दि.२१) बैठक पार पडली.

‘उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ’ स्पर्धेत २५ ऑगस्टपर्यंत सहभागी होण्याची संधी – सविस्तर बातमी 

गणेश विसर्जन मिरवणूकीत सकाळी सात वाजेपासून सहभागी होण्याची भूमिका काही मंडळांनी घेतली होती. त्यासोबतच भाउ रंगारी आणि मंडई गणेश मंडळाकडूनही आपआपल्या वेळेऐवजी विसर्जन मिरवूणकीत सहभागी होण्याची दुसरी वेळ निश्चीत केली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणूकीची दरवर्षीची परंपरा खंडित होउन मंडळांमध्ये एकनिष्ठता राहणार नव्हती. यासंदर्भात पदाधिकारी, प्रशासकीय पातळीवर वारंवार बैठका पार पडल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र, कोणतेही मंडळ विसर्जन मिरवूणकीच्या वेळेत बदल करण्यास तयार होत नव्हते. अखेर यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भाउ रंगारीचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, मंडई गणपती मंडळाचे अण्णा थोरात यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांना पोलीस प्रशासनाकडून विनंती करीत भूमिका समजावून सांगितली. त्यानुसार दोन्ही मंडळांनी दरवर्षीप्रमाणेच यंदाही आपआपल्या वेळेप्रमाणेच सहभागी होणार असल्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे.

पोलीस बँडद्वारे केले जाणार वादन

राज्य सरकारने यंदाचा गणशोत्सव राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडूनही उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलीस बँडद्वारे ठिकठिकाणी बाप्पांना मानवंदना दिली जाणार आहे. प्रामुख्याने मानाचे गणपती, नावाजलेल्या गणपती मंडळासमोर पोलीस बँडकडून वादन केले जाणार आहे. मंडळांप्रमाणेच पोलिसांकडूनही बाप्पांची वादनरूपी सेवा केली जाणार आहे.

पोलीस बांधतील तेच तोरण, सांगतील तेच धोरण

गणपती विसर्जन मिरवणूकीच्या वेळेमुळे अनेक मंडळांमध्ये शाब्दिक शीतयुद्ध रंगले असून, अमुक-तमूक वेळेत आम्ही रांगेत शिरणार अशा प्रकारे बोलले जात होते. त्यामुळे विसर्जन मिरवणूकीच्या शिस्तीला बाधा निर्माण होणार होती. त्यापार्श्वभूमीवर आता भाउ रंगारी गणेशोत्सव मंडळ आणि मंडई गणपती मंडळांकडून पोलिसांच्या विनंतीला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या मंडळांकडूनही या मंडळांचा आदर्श घेउन आपआपल्या वेळेतच विसर्जन मिरवणूकीत सहभागी होण्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पुण्यातील गणशोत्सवाचा नावलौकिक असून, विसर्जन मिरवणूकीच्या अनुषंगाने वेळेबाबत काही मंडळांमध्ये एकमत होत नव्हते. त्यापार्श्वभूमीवर आम्ही दोन्ही गणपती मंडळांना विनंती केली होती. त्याला मंडळांनी संमती दिली असून, दरवर्षीच्या वेळेप्रमाणेच ते यंदाही विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार असल्यामुळे वेळेचा तिढा संपुष्टात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×