Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

९९ व्या साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे उद्या लोकार्पण

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर साताऱ्यात होणाऱ्या पहिल्या साहित्य संमेलनाची डिजिटल ओळख

marathinews24.com

पुणे – मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासासह साताऱ्यातील वीर पुत्रांची ओळख करून देणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ मंगळवारी (दि.१६) होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनतर्फे दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथील शाहू स्टेडियम मध्ये होणार आहे.

लेखिका सुनीता लाड – भामरे यांच्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव – २०२५ ठरला ‘घरवापसी’चा क्षण! – सविस्तर बातमी

संमेलनाच्या संकेतस्थळाचा लोकार्पण समारंभ श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जपत छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी निर्मिलेल्या स्वराज्याच्या राजधानीत; अर्थात साताऱ्यात ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीत होत असलेले हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सातारा नगरी सज्ज होत असून ही साहित्यनगरी सारस्वत आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे.

९९ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याची भौगोलिक माहिती, जिल्ह्यातील वीर पुत्रांची ओळख, साताऱ्याच्या मातीत जन्मलेले आणि आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारे कर्तृत्ववान यांसह संमेलनाचे वैशिष्ट्य दर्शविणारी माहिती, आकर्षक मुखपृष्ठासह संमेलनाच्या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध होत आहे. यात साहित्य संमेलनाचे वेळापत्रक, संमेलनस्थळ, स्वागत समिती, आमंत्रित पाहुणे, उद्‌घाटन समारंभ यांसह संमेलनादरम्यान होत असलेला माय मराठीचा जागर आणि या संपूर्ण उपक्रमासाठी अविरतपणे कार्यरत असलेल्या स्वागताध्यक्षांसह पदाधिकारी आदींचे परिचय करून देण्यात आला आहे. समाजमाध्यमांत संमेलनाविषयीची वृत्ते, छायाचित्रे, चित्रफिती यांसह ताज्या घडामोडींविषयी संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×