Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

श्री रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे मुंडन या अनिष्ट प्रथेविरोधात जनजागृतीची गरज

श्री रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे मुंडन या अनिष्ट प्रथेविरोधात जनजागृतीची गरज

अनिष्ट प्रथांचे समर्थन करणाऱ्या विरोधात कारवाईची गरज – राज्य महिला आयोग

marathinews24.com

पुणे – दौंड तालुक्यात असलेल्या श्री रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे मुंडन करण्याच्या प्रथेविरोधात व्यापक जनजागृती करणे व अशा अनिष्ट प्रथांचे समर्थन करणाऱ्या विरोधात अंधश्र‌द्धा निर्मूलन काय‌द्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या बैठकीत चर्चा झाली.

प्रत्येकाने कर्तव्यनिष्ठा, आत्मीय भावनेने सेवा द्यावी – उपसंचालक डॉ. किरण मोघे – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांच्या अध्यक्षतेखाली रोटमलनाथ मंदिरात मातांचे मुंडन करण्याच्या प्रथेबाबत बैठक झाली. यावेळी महिला व बाल विकास पुणे विभागीय उपआयुक्त संजय माने, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, परिविक्षा अधिकारी बी. बी. घालमे, जिल्हा संरक्षण अधिकारी ए.सी. मोजर, समुपदेशक ए. जी. शिरसाठ, सरीता वाडेकर, भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील आदी उपस्थित होते.

राज्य महिला आयोग कार्यालयाकडे स्वयंसेवी संस्थेने रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे मुंडन करण्यात येते याबाबत तक्रार केली आहे. या प्रथे‌द्वारे महिलांच्या आत्मसन्मानास तडा जात असून त्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रथेबाबत प्रसार माध्यमावर प्राप्त झालेल्या चित्रफितीचे अवलोकन केले असता मुलासोबत आईचे मुंडन केल्याबाबतच्या तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे अंधश्र‌द्धा निर्मूलन कायदा अंतर्गत याप्रथेचे समर्थन करणाऱ्या विरोधात कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. बैठकीत चर्चेदरम्यान या अनिष्ट प्रथेबाबत स्वयंसेवी संस्था, समुपदेशक व पोलिस प्रशासन यांच्या सहकार्याने गावात जनजागृती करण्यात यावी असे ठरले.

या बैठकीत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी समन्वय आणि सकारात्मक दृष्टीकोनाबाबत उदाहरण दिले. दौंड तालुक्यातील मौजे कुसेगाव येथील यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनामार्फत चर्चा करून योग्य नियोजन करण्यात आले आहेत. यावर्षी गावकऱ्यांकडून पशुहत्याबंदी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दौंड तालुक्यातील मौजे रोटी येथील मुंडन प्रथेच्या अनुषंगाने पीडित महिलांच्या तक्रारीबाबत शासन आदेशानुसार व काय‌द्याच्या तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही देशमुख म्हणाले.

आयोगाकडे प्राप्त तक्रार आणि या प्रथेबाबत सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांचे अध्यक्षतेखाली दि.२ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत मौजे रोटीयेथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, यवतचे पोलिस निरीक्षक , बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), तालुका संरक्षण अधिकारी, मौजे रोटी येथील सरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदीनी माहितीसह उपस्थित राहण्याचे आयोगाने निर्देश दिले आहेत, असे आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×