Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

साताऱ्यात ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणारा चोरटा अटकेत

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

शिवाजीनगर भागात कारवाई

marathinews24.com

पुणे – सातारा शहरात ज्येष्ठ महिलेची फसवणूक करुन पसार झालेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरात ही कारवाई करण्यात आली. इब्राहीम बाबू इराणी (रा. इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सातारा शहरातील शाहूपुरी परिसरातील एका बँकेतून रोकड काढून बाहेर आलेल्या ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन तिच्याकडील सात हजार रुपयांची रोकड इराणीने चोरुन नेली होती.

विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार – सविस्तर बातमी

साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरटा आढळून आला होता. त्यानुसार सातारा पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. दरम्यान, ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणरा चोरटा पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी महेंद्र कडू यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने इराणीला पाटील इस्टेट भागातील इराणी वस्तीतील राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीत इराणीने सातारा शहरात ज्येष्ठ महिलेकडील रोकड चोरल्याचे उघड झाले.

इराणी हा सराईत चोरटा आहे. त्याने पुणे शहर, जिल्हा, तसेच रायगड जिल्ह्यात ज्येष्ठांकडे बतावणी करुन त्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हेही दाखल झाले हाेते. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक संताेष पाटील, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार संतोष मेमाणे, सचिन जाधव, महेंद्र कडू, रोहित झांबरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×