Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार

हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रशांत प्रकाश चव्हाण (वय ४२, रा. कीर्तने बाग, मुंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीओमध्ये गुंतवणूकीचे आमिष, ४३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय पीडित महिलेची आरोपी चव्हाण याच्याशी तीन वर्षांपूर्वी विवाहविषयक संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने महिलेशी संपर्क साधला आणि विवाह करण्याबाबत उत्सुक असल्याचे सांगितले. विवाहाचे आमिष दाखवून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याने विवाहास नकार दिला.

त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक साने तपास करत आहेत. दरम्यान, विवाहविषयक संकेतस्थळावरुन आमिष दाखवून महिलांची फसवणूक, तसेच बलात्कार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. महिलाकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जाते. बिबवेवाडी भागातील एका डाॅक्टर तरुणीची विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर महिलेने दवाखान्यात विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केली होती .विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी करताना महिलांनी खातरजमा करणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×