Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

तोतया वकील स्नेहल कांबळेविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

ज्येष्ठ महिलेची ५ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – तोतया वकील स्नेहल कांबळेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळेने वकील असल्याची बतावणी करुन आतापर्यंत तिघांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तिच्याविरुद्ध फसवणुकीचे आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

वकील असल्याची बतावणी करुन मुलाला घटस्फोट मिळवून देते, असे आमिष दाखवून कांबळेने एका ज्येष्ठ महिलेची पाच लाख ३० हजारांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली. कांबळेविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. कांबळे सध्या पोलीस कोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल कांबळेने ज्येष्ठ महिलेकडे वकील असल्याची बतावणी केली. महिलेचा मुलगा आणि सूनेमध्ये वाद सुरू होते. घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ज्येष्ठ महिलेकडून कांबळेने वेळोवेळी रोख स्वरूपात पैसे घेतले. अटकेची भीती दाखविली, तसेच पोलिसांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून पैसे उकळले. कांबळेने महिलेची पाच लाख ३० हजारांची फसवणूक केली. कांबळेविरुद्ध फसवणूक, तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी कांबळेने महिलेला जाळ्यात ओढले होते. मुलाला घटस्फोट मिळवून देते, असे आमिष दाखवून सहा लाख रुपये घेतले होेते. दुसऱ्या एका प्रकरणात एका महिलेच्या विवाहित मुलीला न्याय मिळवून देते, पतीच्या ताब्यातून मुलगा मिळवून देते, असे सांगून एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली होती.

पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन

आरोपी स्नेहल कांबळेने वकील असल्याची बतावणी करुन अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटस्फोट, चोरी, बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात येईल, अशी भीती दाखवून तिने तक्रारदारांकडून पैसे उकळले आहेत. तिच्याविरुद्ध तक्रार असल्यास तक्रारदारांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×