Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

गॅसपुरवठा बंद करण्याची धमकी, सायबर चोरट्याने लुटले

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरगुती गॅस पुरवठा बंद करण्याची धमकी देउन, सायबर चोरट्यांनी एका महिलेला एपीके फाईल पाठवून डाउनलोड करण्यास भाग पाडली. त्यानंतर बँकखात्याचा ऑनलाईनरित्या अ‍ॅक्सेस घेउन २ लाख ८८ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १० नोव्हेंबरला दुपारी एकच्या सुमारास कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी तरूणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जिथं माजवली दहशत, तिथेच पोलिसांनी काढली टोळीची धिंड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणीसह तिची आई कोंढव्यात राहायला असून, १० नोव्हेंबरला दुपारी एकच्या सुमारास सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. गॅस कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत तुमचे गॅसचे बील अपडेट झाले नसल्याचे सांगितले. रात्रीच्या सुमारास गॅस कनेक्शन तोडले जाणार असून, त्यासंदर्भात संबंधिताने महिलेच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठविली. त्यानंतर संबंधित फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडून, नेट बँकिंगसह डेबीट कार्डचा अ‍ॅक्सेस घेतला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी ऑनलाईनरित्या २ लाख ८८ हजार रूपये स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×