अनुसूचित जातींच्या युवक-युवतींसाठी सात अभ्यासक्रमांचे तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण

अनुसूचित जातींच्या युवक-युवतींसाठी सात अभ्यासक्रमांचे तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण

बार्टी व विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानाच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

marathinews24.com

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि विज्ञान व तंत्रज्ञान उद्यान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, एस. एम. जोशी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला.

भक्तामर कलश तीर्थावर झाला दिगंबर जैन राष्ट्रसंतांचा दुर्मिळ समागम- सविस्तर बातमी 

अनुसूचित जातींच्या बेरोजगार युवक-युवतींसाठी हा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून तो पूर्णपणे मोफत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ग्राफिक डिझायनर, सोशल मीडिया एक्झिक्यूटिव्ह, आयटी हेल्पडेस्क अटेंडंट, जीएसटी असिस्टंट, सीनियर असोसिएट – डेस्कटॉप पब्लिशिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल मेंटेनन्स टेक्निशियन आणि ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन अशा सात अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एकनाथ मुंढे, प्राचार्य, एस. एम. जोशी महाविद्यालय होते. प्रमुख अतिथी म्हणून सोनाली भट्टाचार्जी, प्रकल्प संचालिका, विज्ञान व तंत्रज्ञान उद्यान, पुणे उपस्थित होत्या. तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. संजय अहिवळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक, एस. एम. जोशी महाविद्यालय उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. एकनाथ मुंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्य विकास महत्त्वाचा असून त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे सांगितले. तर सोनाली भट्टाचार्जी यांनी युवक सशक्तीकरणासाठी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला अनिल करांडे, उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख (कौशल्य विकास विभाग), बार्टी, पुणे, प्रज्ञा मोहिते, कार्यालय अधीक्षक, बार्टी, पुणे तसेच महेश गवई, प्रकल्प व्यवस्थापक, बार्टी, पुणे यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानचे प्रकल्प समन्वयक डॉ. मनोज कुलकर्णी यांनी केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी बार्टीचे महासंचालक तसेच विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तर आभार प्रदर्शन विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानचे प्रकल्प व्यवस्थापक वैभव निमगिरे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×