Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शहरात वेगवेगळ्या अपघातात महिलेसह तिघांचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

ओैंध, मुंढवा, खराडी बाह्यवळण मार्गावर अपघाताच्या घटना

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ओैंध, मुंढवा, तसेच खराडी बाह्यवळण मार्गावर अपघाताच्या घटना घडल्या. खराडी बाह्यवळण मार्गावर भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शकुंतला निकाळजे (वय ५५) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार राहुल गिरमे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले; गैरसमजातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला निकाळजे या खराडी बाह्यवळण मार्ग परिसरातून ५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास निघाल्या होत्या. त्या वेळी मणिपाल हाॅस्पिटलसमोर भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या निकाळजे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.

ओैंध परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विजयसिंग गोकुळसिंग राजपूत (वय ५४, रा. मेडीपाॅईंट हाॅस्पिटलजवळ, ओैंध) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भगवानसिंग मोहनसिंग राजपूत (वय ५८) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवानसिंग यांचे मेहुणे विजयसिंग राजपूत हे ५ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास ओैंधमधील गायकवाड पेट्रोल पंप परिसारतून निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबत वाहन चालक पसार झाला. सहयाक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.

क्रेनच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढव्यातील केशवनगर भागात घडली. या प्रकरणी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. साहेबराव विठोबा दंडारे (वय ७२) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा रवींद्र (वय ४२, रा. बारगावत, वरुड, जि. अमरावती) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबहराव हे मुंढवा-केशवनगर परिसरातील झेड काॅर्नरजवळ रस्त्याच्या कडेला झाेपले होते. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी क्रेन च्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×