Breking News
Pune Soldier Welfare Scheme : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजारांचे वितरणPune MCOCA Action : पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’Pune Fodder Management Plan : पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात – विशेष लेखPune Crop Insurance Scheme : पीक व फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा; व्यापक जनजागृती करा – वैभव तांबेPune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाईPune House Burglary News : पुण्यात तीन ठिकाणी घरफोड्या; दागिने, रोकड लंपासPune Cyber Crime News : रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या बहाण्याने दोघांना १७ लाखांचा गंडाSkill Development for Youth : कौशल्यसंपन्न युवा पिढी घडविणे हीच विकसित देशाची खरी गुरुकिल्ली- डॉ. विजय भटकरMaharashtra Fodder Shortage : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जPune Police Action Against Criminals : पुणे पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

marathinews24.com

मुंबई – राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार *२१ ऑगस्ट पासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर* इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ४ सप्टेंबरला जिल्हास्तरीय कार्यशाळा – सविस्तर बातमी 

मंत्री सरनाईक म्हणाले, महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना वाहनांना ठराविक मार्गांवरून प्रवास करताना टोल नाक्यांवरून सूट देण्यात आली आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, खालीलप्रमाणे इलेक्ट्रिक चारचाकी व बस वाहनांना टोल करातून सूट दिली आहे. इलेक्ट्रिक चारचाकी वाहने (M2, M3, M6 श्रेणीतील) इलेक्ट्रिक बसेस -राज्य परिवहन उपक्रम ( STU ) तसेच खासगी इलेक्ट्रिक बसेस (M3, M6) प्रकारातील

वरील वाहनांना राज्यातील ठराविक महामार्ग व मार्गावरील टोल नाक्यांवरून टोल कर भरण्यापासून सूट राहील. ही सूट २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री पासून लागू झाली आहे. शासनाचा हा निर्णय राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व स्वच्छ ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×