मका देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यांची १० लाख ४० हजारांची फसवणूक

मका देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यांची १० लाख ४० हजारांची फसवणूक

बीडच्या चौसाळ्यातील घटना; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – स्वस्त दरात मका देण्याचे बहाण्याने व्यापाऱ्याची तब्बल १० लाख ४० हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाजेर मस्जीद सौदागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोट्यावधींची गंडा घालणाऱ्या सौरभ कुलकर्णीला ७ दिवसांची पोलीस कोठडी – सविस्तर बातमी 

चौसाळा येथील रहिवासी असलेले नाजेर मस्जीद सौदागर यांचा सौदागर पोल्ट्री फॉर्म आणि सौदागर ट्रेडर्सचा व्यवसाय आहे. दि . ६ जानेवारी २०२६ रोजी त्यांना फिरोज नसीम खान नावाच्या व्यक्तीचा फोन आला. आपल्याकडे १५० टन मका असून तो सुलतानपूर येथील गोदामात असल्याचे त्याने सांगितले. सौदागर यांनी त्याच्याकडून ७५ टन मका घेण्याचे ठरवले. व्यवहार पक्का झाल्यावर फिरोज खान याने पैसे पाठवल्याशिवाय गाड्या पाठवणार नाही असे सांगितले. विश्वासापोटी सौदागर आणि त्यांच्या मुलाने मिळून फिरोज खान याच्या बँक खात्यावर आणि ड्रायव्हरच्या फोन पे नंबरवर एकूण १० लाख ४० हजार रुपये ऑनलाइन पाठवले पैसे मिळाल्यावर ८ जानेवारीपर्यंत माल पोहोचेल असे आश्वासन संबंधित गंडा घालणाऱ्या आरोपीने दिले होते, मात्र मुदत उलटूनही मका मिळाला नाही.

आरोपीने आपला फोन बंद करून सौदागर यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाजेर सौदागर यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी आरोपी फिरोज नसीम खान आणि त्याचा ड्रायव्हर यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश केले करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×