Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बदल

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश

१४ ते १६ जानेवारीदरम्यान पुण्यात निवडणूक कालावधीतील वाहतूक बदल

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतपेटी वाटप, वाहतूक, तसेच मतदान केंद्र परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १४ ते १६ जानेवारी दरम्यान वेगवेगळ्या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीची झाडाझडती – सविस्तर बातमी 

विमानतळ वाहतूक विभागअंतर्गत फिनिक्स माॅल मागील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांनी विमाननगर चौक, नगर रस्ता मार्गाचा वापर करावा. विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत टिळक रस्त्यावरील पूरम चौक, टिळक चौक हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता या मार्गाचा वापर करावा. दत्तवाडी वाहतूक विभागातील ना. सी. फडके चौक (निलायम चित्रपटगृह), तसेच सारसबाग परिसरातील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक या मार्गाचा वापर करावा. टिळक रस्त्याकडे येणारी वाहतूक देशभक्त केशवराव जेधे चौकातून (स्वारगेट) वळविण्यात येईल, असी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

हडपसर विभागातील शिवसेना चौक ते साने गुरूजी मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहन चालकांनी अमरधाम, माळवाडी, डीपी रस्ता, हडपसर गाडीतळ या मार्गाचा वापर करावा. समर्थ वाहतूक विभागातील नेहरू रस्त्यावरील पाॅवर हाऊस चौक ते संत कबीर चौक, ए. डी. कॅम्प चौक ते जुना मोटार स्टंंड या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी रास्ता पेठेतील शांताई चौक, क्वार्टर गेटमार्गे इच्छितस्थळी जावे.

कोरेगाव पार्क भागातील नाॅर्थ मेन रस्ता, महात्मा गांधी चौक परिसरातील रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. चालकांनी कोरेगाव पार्क मुख्य चौक, एबीसी फार्ममार्गे इच्छितस्थळी जावे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×