Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

वाहतूक कोंडी होऊ नये, दोन्ही बाजूकडील वाहतुकीत बदलाचे आदेश

marathinews24.com

पुणे – पेरणे येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पुणे-अहिल्यानगर महामार्ग क्र.६० वर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५ वा. पासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२:०० वा. पर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतुकीत बदलाचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवालाचे जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते विमोचन – सविस्तर बातमी 

याअंतर्गत चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहिल्यानगर कडून पुणे-मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे जातील.

पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसरवरुन पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर-अहिल्यानगर मार्ग अशी वळविण्यात येतील. तसेच सोलापूर महामार्गावरुन आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडीहून आळंदी व चाकण येथे जातील.

मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप आदी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जातील, मुंबई व ठाणे कडून येणारी अनुयायांची वाहने मुंबई-पुणे महामार्गावरुन देहूरोड-निगडी-चऱ्होली-आळंदी-मरकळ-तुळापूर फाटा (लोणीकंद) अशी वळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×