मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

खंडाळा घाटात रांग

marathinews24.com

पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली. सलग सुट्ट्या आल्याने लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. मुंबईहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक विस्कळीत झाली. खंडाळा घाटात दहा ते बारा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाले.

जुन्नरमध्ये आतापर्यंत ६८ बिबट पकडले – सविस्तर बातमी 

नाताळापासून लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी सुरू होते. नाताळाच्या सुट्टीत गर्दी वाढते. शनिवार आणि रविवार सुट्टी आल्याने मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येेने लोणावळ्यात दाखल झाले. शनिवारी सकाळपासून द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घाटक्षेत्रात वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर वाहतुकीचा वेग संथ झाल्याने कोंडीत भर पडली. कोंडी हटविण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविली. त्यानंतर १५ ते ३० मिनिटांचा ‘ब्लाॅक’ घेऊन मुंबईहून लोणावळा, पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सर्व मार्गिका खुल्या करुन देण्यात आल्या.

मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर खंडाळा ते खालापूर टाेलनाका दरम्यान कोंडी झाली. महामार्ग पोलिसांनी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठराविक काळासाठी (ब्लाॅक) थांबविल्याने खंडाळा बोगदा ते गोल्ड व्हॅलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. द्रुतगती मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक खोपोली गावातून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली. त्यानंतर जुन्या मुंबई-पुणे महमार्गावर खंंडाळा ते शिंग्रोबा मंदिर दरम्यान वाहतूक कोंडी झाली.

द्रुतगती मार्ग, तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी सकाळी कोंडी झाली. कोंडीमुळे लोणावळा, खंडाळा, खोपोली परिसरातील स्थानिकांना कोंडीत अडकून पडावे लागली. घाटक्षेत्रात मोठ्या संख्येने वाहने आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. महामार्ग पोलिसांची कोंडी सोडविताना दमछाक झाली. घाटात मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने बंद पडल्याने कोंडीत भर पडली. कार्यालयीन कामासाठी, तसेच मुंबई विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना कोंडीचा फटका बसला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×