Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

कर्वेनगरमध्ये दुचाकीस्वाराच्या अंगावर झाड कोसळले, एकजण ठार, परिसरात वाहतूक कोंडी

कर्वेनगर परिसरातील दुर्दैवी घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील कर्वेनगर परिसरात दुर्दैवी घटना घडली असून , अलंकार पोलिस चौकीजवळ रस्त्याच्या कडेला असलेले भले मोठे झाड परिसरातुन जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाच्या अंगावर पडले. त्यामुळे गंभीरपणे जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी (दि.२६) रात्री पावणे आठच्या सुमारास अलंकार पोलीस चौकीजवळ घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल श्रीकांत जोशी ( वय ४९, रा.नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

दौंड मध्ये इमारतीची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी

झाड रस्त्यावर पडल्याने परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार जोशी हे कामावरून सुटल्यावर अलंकार पोलीस चौकीजवळुन जात होते. रात्री पावणे आठच्या सुमारास भले मोठे झाड अचानकपणे जोरात रस्त्यावर कोसळले. झाड इतक्या वेगाने पडले की दुचाकीस्वार जोशी हे झाडाखाली दबले गेले. त्यांच्या सोबत एक मोटरही झाडाखाली अडकली. आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी जखमीला मदत करण्यासाठी तत्काळ धाव घेतली. घटनेची माहिती पोलिस, अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांसह अलंकार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमी अवस्थेत तरूणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांसह उद्यान विभागाने झाड हटवण्याचे काम हाती घेतले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान, धोकादायक झाडे वेळीच हटवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, हे मोठे झाड कोसळून दुचाकीस्वार ठार झाल्यामुळे महापालिका प्रशासनासह उद्यान विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सध्या पोलीस घटनेचा अधिक तपास करत असून, सार्वजनिक सुरक्षेच्या उपाय योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×