Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

दौंडमध्ये इमारतीचा भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

दौंडमध्ये इमारतीचा भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

वर्दळीच्या बाजारपेठेत घटना घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली

marathinews24.com

दौंड – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील गणपती मंदिराजवळ इमारतीची भिंत कोसळून एका जेष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि २६) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. ताराबाई विश्वचंद्र आहेर (वय ७५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भामा आसखेड धरणाजवळ मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज पडून मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई आहेर त्यांच्या ‘वैष्णवी फ्लॉवर मार्ट’ दुकानात बसल्या होत्या. सोमवारी पावसामुळे भिंत फुगून अचानक कोसळली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उप-जिल्हा रुग्णालय, दौंड येथे उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे यांना घटनेची माहिती फोनवरून दिली आहे.

दौंडमध्ये इमारतीचा भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नेहमीच्या वर्दळीच्या बाजारपेठेत घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक प्रशासनाकडून अशा जीर्ण इमारतींबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×