Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे वृक्षरक्षाबंधन

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे वृक्षरक्षाबंधन

उपक्रमांतर्गत संगमवाडी पुलाजवळील परिसरात शेकडो देशी वृक्षांचे रोपण

marathinews24.com

पुणे – बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने वृक्षरक्षाबंधन साजरे करण्यात, आले. या उपक्रमांतर्गत संगमवाडी पुलाजवळील परिसरात शेकडो देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षारोपणाचा शुभारंभ बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय गुजर व पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक उद्यान अधीक्षक रत्नाकर करडे यांच्या हस्ते झाला. यावेळी बीएआय महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, महापालिकेचे माजी उद्यान अधीक्षक यशवंत खैरे, ‘बीएआय’चे उपाध्यक्ष राजाराम हजारे, माजी अध्यक्ष सुनील मते, पदाधिकारी मनोज देशमुख सी. एच. रतलानी, धैर्यशील खैरे पाटील यांच्यासह असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशासकीय उदघाटनासाठी बांधलेल्या स्टेजसाठी कायदेशीर कारवाई होणार का-अरविंद शिंदे – सविस्तर बातमी 

अजय गुजर म्हणाले, “पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असते. कामगारांच्या मुलांचा सन्मान, त्यांना शिष्यवृत्ती, वेलबिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन, संस्थेचे सदस्य व बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी उपक्रम राबविण्यात येतात. शहराच्या मध्यवर्ती भागात केलेल्या वृक्षारोपणामुळे पुणेकरांना ऑक्सिजन मिळेल.”

रत्नाकर करडे यांनी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. बांधकाम क्षेत्रातील लोकांकडून झाडे लावण्यासारखा उपक्रम राबवणे हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. सुनील मते यांनी वृक्षारोपण उपक्रमासाठी पुढाकार व परिश्रम घेतले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×