Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

मेफेड्रोन विक्री प्रकरणात दोघे अटकेत

मेफेड्रोन विक्री प्रकरणात दोघे अटकेत

स्वारगेट परिसरात कारवाई; मेफेड्रोनसह कोयता जप्त

marathinews24.com

पुणे – मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना खडक पाेलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून एक लाख २३ हजार रुपयांचे मेफेड्रोन, तसेच कोयता जप्त करण्यात आला. अब्दुल अकबर खान (वय १९, रा. दत्तवाडी) , धीरज उर्फ गुड्डू नीलेश कदम (वय १९, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई आशिष चव्हण यंनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाटसरू महिलेवर बलात्कार करणारा गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण आणि इम्रान नदाफ हे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत होते. स्वारगेटजवळ खान आणि कदम हे मध्यरात्री एकच्या सुमारास थांबले होते. दोघांकडे पिशवी होती. पोलीस कर्मचारी चव्हाण आणि नदाफ यांनी त्यांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. पोलिसांना पाहताच दोघांनी पसार होण्याचा प्रयत्न केला. खान आणि कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत सहा ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आणि कोयता सापडला. जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत एक लाख २३ हजार ६०० रुपये आहे.

दोघांनी मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच ते कोणाला विक्री करणार होते ? , यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेचे निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भरत बोराडे तपास करत आहेत.

अमली पदार्थ विक्रेते, तसेच तस्करांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. मेफेड्रोन महाग आहे. त्यातुलनेत गांजा स्वस्त असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर गांंजा परराज्य, तसेच परगावाहून विक्रीस पाठविला जात आहे. अनेक तरुण गांज्याच्या आहारी गेले आहेत. गांजा विक्री, तसेच तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×