Breking News
सोसायटी सुरक्षारक्षकाच्या पोटात चाकूने वारमाऊलींच्या पालखी सोहळ्यात बिल्डरच्या गळ्यातील ९ लाखांची चैन चोरीलाखिशात हात घालून रोख १५ हजार पळविलेसिमेंटचा गट्टू मारून एकाचा खून करण्याचा प्रयत्नओढे – नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थितीआळंदी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहिमेस गती अलंकापुरी सुनीसुनीमोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्दग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्रीपालखी सोहळ्यावेळी हरवलेल्या महिलेची दिंडी प्रमुखासोबत घडवली भेटमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवाद वारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

डेक्कन पोलीस ठाण्यातील दोघे कर्मचारी निलंबित

डेक्कन पोलीस ठाण्यातील दोघे कर्मचारी निलंबित

मैत्रिणीसोबत थांबलेल्या तरुणाकडून उकळले पैसे

marathinews24.com

पुणे – मैत्रिणीसोबत मोटारीत गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला धमकावून २० हजार रुपये उकळणारे डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ एकचे प्रभारी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिले. गणेश तात्यासाहेब देसाई, योगेश नारायण सुतार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने तक्रार दिली होती.

रिक्षाचालकाडून दुचाकीस्वार तरुणावर वार, शिवणे भागातील घटना – सविस्तर बातमी 

तक्रारदार वारजे भागात राहायला असून, विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात मंगळवारी रात्री मैत्रिणीसोबत मोटारीत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी रात्रपाळीत पोलीस कर्मचारी गणेश देसाई, योगेश सुतार हे गस्त घालत होते. कर्मचारी देसाई आणि सुतार तेथे आले. ‘तुमच्याबद्दल तक्रार आली आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण न्यायचे नसेल, तर २० हजार रुपये द्या,’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देऊन तक्रारदार मोटार चालकाला दुचाकीवर घेऊन पोलीस कर्मचारी देसाई आणि सुतार कमला नेहरू पार्क परिसरातील एटीएममध्ये नेले. तेथे त्याच्याकडून २० हजार रुपये घेतले.

घटनेनंतर घाबरलेला मोटारचालक आणि त्याच्या मैत्रिणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी देसाई आणि सुतार यांची चौकशी करण्यात आली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दोघांचा अहवाल पोलीस उपायुक्त पिंगळे यांच्याकडे पाठविला. ज्या कायद्याचे उल्लंघन त्यांनी केले होते, त्यानुसार कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे होते. मात्र, देसाई आणि सुतार यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली नाही. त्यांच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून दोघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी दिले.

बोपदेव घाटात छायाचित्रणासाठी गेलेल्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना नुकतीच अटक करण्यात आली होती. याप्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top