Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोथरूडमध्ये मिटर रूमला लागलेल्या आगीत दोन जण जखमी

कोथरूडमधील वनाज परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूडमधील वनाज परिसरातील ‘परिवार सोसायटीमध्ये गुरुवारी दुपारी अडीच वाजता मिटर रूमला आग लागल्याची घटना घडली.

मोक्का कारवाईनंतर ८ महिने फरारीला बेड्या – सविस्तर बातमी

या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण करत डक्टमधील वायरिंग जाळून टाकले. त्यामुळे इमारतीच्या तीन मजल्यावरील पॅसेजमध्ये मोठ्या प्रमाणात धूर व उष्णता निर्माण झाली. त्यामुळे तिन्ही मजल्यांवरील वायरिंग, डोअर बेल्स वितळल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच आगीमुळे घाबरून मुलीने उडी मारल्याने तिच्यासह जिन्याने खाली उतरणारे जेष्ठ नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

सुप्रिया कालेकर ( वय ४५) आरोही कालेकर (वय १२) मृण्मयी आणी मैथिली या जुळ्या बहिणी ( वय १७) आहे..यामधील मृण्मयी हिच्या पायाला दुखापत झाली असल्याचे दिसून आले. लक्ष्मण पडवळ (वय ८५) हे जिन्यामधून खाली येताना जखमी झाले आहेत.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणून इमारतीतील रहिवाशांचे प्राण वाचवले. बचाव कार्यादरम्यान काही नागरिक वरच्या मजल्यांवरील बाल्कनीमध्ये अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. दरम्यान, तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधील चौघींना आग व धुरामुळे भीती वाटल्याने मुलीने बाल्कनीमध्ये उडी मारली. त्यामुळे मुलीच्या पायाला दुखापत झाली. तसेच ८५ वर्षीय आजोबांच्या पायाला जिन्याने उतरतानाही दुखापत झाली आहे. या आगीच्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेत इमारतीचे एकूण २४ मिटर आणि डक्टमधील सर्व वायरींग पूर्णतः जळाले आहे.

कोथरूड फायर ब्रिगेडने वेळीच दाखल होत मोठा अनर्थ टाळला. या बचाव मोहिमेत प्रभारी अधिकारी सुनिल नामे, ड्रायव्हर दत्ता गोगावले, ज्ञानेश्वर बाठे, तांडेल चंद्रकांत गावडे, अमोल पवार, फायरमन शंकर वाबळे, शिवकुमार माने, मनोज गायकवाड, संतोष भोसले आणि योगेश लोखंडे यांचा सहभाग होता.
यापक्ररणी कोथरुड पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×