Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हडपसरमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्धगुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर भागात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. माळवाडी परिसरात मोटारीच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. तर पुणे -सोलापूर महामार्गावरील उड्डाण पुलावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

विवाहाच्या आमिषाने महिलेवर केला बलात्कार – सविस्तर बातमी

भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास साडेसतरा नळी रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खंडू भगवान गायकवाड (वय ३४, सध्या रा. नेहरुनगर, वागळे इस्टेट, ठाणे, मूळ रा. सास्तूर, ता. लोहारा, जि. धाराशिव ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. भगवान नामदेव गायकवाड (वय ७५) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खंडू गायकवाड साडेसतरा नळी रस्त्याने निघाला होता. त्यावेळी भरधाव मोटारीने त्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर भागात असलेल्या उड्डाणपुलावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण मूळचा कर्नाटकातील आहे. त्याच्या कुटुंबीयांनी नुुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात दुचाकीस्वार यल्लापा शरणप्पा इंगलागी (वय २७, रा. कुंद्री सालावड, जि. विजापूर, कर्नाटक) याचा मृत्यू झाला होता. याबाबत यल्लप्पा याचा भाऊ जगदीश इंगलगी (वय २४) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार यल्लाप्पा हा २६ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हडपसर परिसरातील उड्डाणपुलावरुन निघाला होता. त्यावेळी भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×