Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

विवाहाच्या आमिषाने महिलेवर केला बलात्कार

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

छायाचित्रे प्रसारित करण्याच्या धमकीने १० लाखांची मागणी

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करुन तिची समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपीने महिलेला धमकावून तिच्याकडून १ लाख २२ हजार रुपये घेतले. याप्रकरणी एकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वीरेन धीरजकुमार रणशृंगारे (वय ३३, रा. बुधवार पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वस्तात सोने पडले महागात; २५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३१ वर्षीय महिला आणि आरोपी रणशृंगारे यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर आरोपीने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. आरोपीने महिलेची छायाचित्रे मोबाइलवरुन काढली, तसेच चित्रफीत तयार केली केली.

समाज माध्यमात छायाचित्रे, चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून १ लाख २२ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने छायाचित्रे, चित्रफीत महिलेची बहीण आणि तिच्या पतीला दाखविली. ‘छायाचित्रे, चित्रफीत प्रसारित केल्यास समाजात बदनामी होईल. हा विषय संपवून टाकतो. १० लाख रुपये द्या’, अशी धमकी त्यांना दिली. अखेर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×