Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यातील दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

बुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’

येरवडा पोर्श अपघात प्रकरण

marathinews24.com

पुणे – बेदरकारपणे अलिशान पोर्श वाहन चालवून दोघा अभियंता तरुण-तरुणीचा जीव घेतल्याची घटना कल्याणीनगर परिसरात घडली होती. याप्रकरणी तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन दोन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी बडतर्फ केलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

कुख्यात नीलेश घायवळ फरार घोषित – सविस्तर बातमी 

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी घडली होती. या प्रकरणात शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिकाच्या मुलासह मित्रांना येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेव्हा लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून मुलांना पोलीस ठाण्यात पिझ्झा पाठवल्याचा आरोप झाला होता. तसेच आरोपी मुलाच्या रक्तात मद्याचे अंश सापडू नयेत, या हेतूने रक्त तपासणीसाठी विलंब लावला होता.

ससून रुग्णालयात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलासह त्याच्या मित्रांना रक्त तपासणीसाठी नेण्यात आले, तेव्हा बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाऐवजी त्याच्या आईने रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले होते. येरवडा पोलीस ठाण्यातील तत्कालीन निरीक्षक राहुल जगदाळे, सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी तपास योग्य पद्धतीने न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांसह, अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील, आई, तसेच अन्य आरोपींना अटक झाली. जगदाळे, तोडकरी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीत आढळून आले, तसेच पोलीस शिपाई अमित शिंदे, आनंद भोसले यांचा संशयास्पद सहभाग आढळून आला. जगदाळे आणि तोडकरी यांनी पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले.

पोलीस शिपाई शिंदे, भोसले यांची पाच वर्षे वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले. अपघात घडल्यानतंर शिंदे, भोसले घटनास्थळी पोहोचले होते. ही माहिती त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली नव्हती. त्यामुळे रात्रपाळीत गस्तीवर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कल्याणीनगर अपघाताची माहिती मिळाली नव्हती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×