Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

अपघातात दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू

धायरी परिसरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

कात्रज चौक, येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर अपघात

marathinews24.com

पुणे – स्वातंत्र्यदिनी शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कात्रज चौक आणि येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या.

केशव माधव विश्वस्त निधी तर्फे गुणवंत विद्यार्थांचा गौरव – सविस्तर बातमी

कात्रज चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१५ ऑगस्ट) घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली. मोहम्मद इक्बाल परवेज पठाण (वय २१, रा. राजस सोसायटी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पोचालक अमोल वसंत भरगुडे (वय ४४, रा. श्रीनाथ रेसीडन्सी, लिपाणे वस्ती, दत्तनगर, आंबेगाव) याला अटक करण्यात आली. याबाबत मोहम्मदच्या बहिणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मोहम्मद हा शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास कात्रज चौकातून निघाला होता. त्या वेळी भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार मोहम्मद याला धडक दिली. टेम्पोच्या चाकाखाली सापडून त्यााच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. टेम्पोचालक भरगुडे याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

.येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. रवी शंकर राठोड (वय १८, रा. मारुती मंदिराजवळ, लोहगाव रस्ता, इंदिरानगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीएमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत राठोड याचा चुलतभाऊ राजू (वय ३५) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रवी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्याने निघाला होता. त्या वेळी भरधाव पीएमपी बसने दुचाकीस्वार रवी याला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. सयायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

पादचारी महिलांकडे बतावणी करुन दागिने लंपास – जेधे चौक, हडपसर भागातील घटना

पादचारी महिलांकडे बतावणी करुन त्यांच्याकडील दागिने लांबविण्याचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी गजबजलेल्या स्वारगेट आणि हडपसर भागात पादचारी महिलांकडे बतावणी करुन त्यांच्याकडील दागिने लांबविल्याची घटना घडली.

स्वारगेट भागातील देशभक्त केशवराव जेधे चौक परिसरात चोरट्यांनी महिलेला बाेलण्यात गुंतवून तिच्याकडील २० हजारांची रोकड आणि २५ हजारांचे दागिने असा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महात्मा फुले पेठेत राहायला आहेत. त्या १४ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास स्वारगेट परिसरातील जेधे चौकातून निघाल्या होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे बतावणी केली. त्यांना बोलण्यात गुंतविले. या भागात चोऱ्या होतात. दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी बतावणी केली. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवीतील रोकड आणि सोन्याचे दागिने आस ४५ हजारांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील तपास करत आहेत.

अशाच प्रकारची आणखी एक घटना हडपसर भागात घडली. ज्येष्ठ महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेकडील ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविले. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ७५ वर्षीय महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्या १४ ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास हडपसरमधील इंद्रप्रस्थ सोसायटी परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी मोफत साडीवाटप करणअयात येत असून,, तुमच्याकडील दागिने काढून पिशवीत ठेवा, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले होते. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवीतून दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×