Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण

राज्यघटनेच्या गौरवशाली प्रवासाला सलाम; पुस्तक प्रकाशनासाठी गडकरींना निमंत्रण

marathinews24.com

नागपूर – भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचालीवरील वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन माननीय राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते ९ डिसेंबरला होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण आज माननीय केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते नितीन।गडकरी यांना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिले.

मतचोरी करणे हाच भाजपाचा फंडा- माजी मंत्री बाळासाहेब थोरात – सविस्तर बातमी 

भेटीदरम्यान राज्यकारभार, विकासकामे आणि विधानपरिषदेच्या उपक्रमांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर फलदायी चर्चा झाली. भेटीदरम्यान सभापती व उपसभापती यांनी ‘महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव, वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता व महत्त्व’ या विषयावरील पुस्तक माननीय गडकरीजी यांना भेट दिले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दाही दिशा’ हे पुस्तक देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेट स्वरूपात प्रदान केले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय मंत्र्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. सदिच्छा भेटीमुळे भावी सहकार्य, संसदीय परंपरा आणि संवाद वृद्धिंगत होण्यास निश्चितच सकारात्मक दिशा मिळाली, असे यावेळी बोलताना सभापती आणि उपसभापती यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×