Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

बारामती आरटीओ कार्यालयाकडून बेशिस्त चालक रडारवर

५६ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

marathinews24.com

बारामती – सुरक्षाविषयक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत ऑगस्ट २०२५ मध्ये वाहतूक ७९९ वाहनावर केलेल्या कारवाईत १ हजार ५०४ एवढ्या विविध गुन्ह्यात वाहन मालक व वाहन चालकांकडून ५६ लाख २५ हजार २५० रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला व बालकांच्या आरोग्य तपासणी – सविस्तर बातमी

अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर ३०५ गुन्हे, विना हेल्मेट वाहन चालविणे १६२, सीट बेल्ट न लावणे १३, अवैध विमाप्रकरणी २२९, क्षमतेपेक्षा अधिक वजन भरलेली वाहने ७१, वाहन चालवितांना भ्रमणध्वनीचा वापर २६, रिफ्लेटर आणि टेल लॅम्प नसणे ५३, दारु पिऊन वाहन चालवणे १३, ताडपत्री अच्छादन नसणे १६, काळी फिल्म लावणे ४, अनुज्ञाप्ती १३२, वाहन परवाना ३३, योग्यता प्रमाणपत्र २४०, वायु प्रदुषण प्रमाणपत्र २०७ असे एकूण १ हजार ५०४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत मोहीमस्तरावर वाहनांची तपासणीचे काम सुरु आहे. नागरिक तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना वाहन चालकांनी वाहतूक सुरक्षाविषयक नियमाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×