Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कोंढव्यात टोळक्याकडून तोडफोड

कोंढव्यात टोळक्याकडून तोडफोड

दहशत माजविणारे अटकेत

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना नुकतीच घडली. टोळक्याने नागरिकांना शिवीगाळ करुन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून,साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल नवाज शेख उर्फ पठाण (वय २५). सादिक शेख (दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सूरज शुक्ला यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पानपट्टी चालकावर शस्त्राने वार करुन रोकड लुटली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात २६ डिसेंबर रोजी कोंढव्यात आरोपी सोहेल, सादिक आणि त्यांच्याबरोबर असलेले दहा ते बारा जण दुचाकीवरुन आले. आरोपींनी परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. ‘आम्ही या भागातील दादा आहोत. गंभीर गुन्हा करुन कारागृहातून बाहेर पडलो आहेत. आमच्या नादाला लागला तर खून करू’, अशी धमकी आरोपींनी दिली. आरोपींनी परिसरात दहशत माजवून तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून परिसरातील नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिली. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×