कोयत्यााच्या धाकाने पानपट्टीची तोडफोड

कोयत्यााच्या धाकाने पानपट्टीची तोडफोड

अल्पवयीनांसह चौघांविरुद्ध गुन्हा; एक जण अटकेत

marathinews24.com

पुणे – सिगारेटचे पैसे मागितल्याने कोयत्याचा धाक दाखवून पानपट्टीची तोडफोड करण्यात आल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यात दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

अमोल सतपालसिंग (वय १९, रा. एसआरए वसाहत, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पानपट्टी चालक सोहेल जावेद मलिक (वय २३, रा. म्हाडा वसाहत, विमाननगर) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील ऑप्टीमस सोसायटीजवळ खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लागतात. तेथे मलिक याची पानपट्टी आहे. आरोपी अमोल आणि त्याचे साथीदार पानपट्टीत आले. एका आरोपीने पानपट्टीतून सिगारेट घेतली. मलिकने सिगारेटचे पैसे मागितले. पैसे मागितल्याने आरोपी चिडले. पैसे का मागितले ? अशी विचारणा करुन आरोपींनी पानपट्टीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. मलिक याला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील दादा आहोत. आमच्याकडे कोणी पैसे मागायचे नाहीत’,असे सांगून आरोपींनी कोयता उगारून दहशत माजविली. पानपट्टीतील साहित्याची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. पोलिसांनी पसार झालेला आरोपी अमोल याला अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×