राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत वेदांतने पटकावला तिसरा क्रमांक

राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत वेदांतने पटकावला तिसरा क्रमांक

केज येथील डॉ.सुरेश बिक्कड यांच्या नातवाचे कौतुक

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मध्यप्रदेश अमॅच्युअर आर्चरी असोसिएशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत केजच्या वेदांत बिक्कड या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन दि. १० ते ११ जानेवारीला मध्य प्रदेशच्या सिंगरौली येथे करण्यात आले होते. १६ मिनी १५ वर्षीय वयोगटातील व १३ वर्षीय वयोगटातील, १० वर्षीय वयोगटातील खेळाडूंनी राज्यस्तरीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

भालबा केळकर नाटिका स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना संस्काराची शिदोरी मिळेल-डॉ. दिलीप शेठ – सविस्तर बातमी 

स्पर्धा सर्व वयोगटातील खेळाडूनी उपस्थितीत उत्साहात पार पडली.या स्पर्धेत सागर जिल्ह्याचे उदयोन्मुख तिरंदाज वेदांत विष्णू चव्हाण याने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. इंडियन राउंड/रिकर्व्ह/कंपाऊंड प्रकारात वेदांत यांनी अचूक नेम साधत पदक जिंकले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभात वेदांत चव्हाण याला सन्मान पत्र व तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पदक देऊन गौरविण्यात आले. त्याच्या यशाबद्दल जिल्हाभरातून व नातेवाईकांनी, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमींकडून कौतुक करत शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×