Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून; मृतदेह नाल्यात टाकला

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

हवेली पोलिसांकडून ६ जण अटकेत

marathinews24.com

पुणे – मित्राच्या घरी जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून केल्याची घटना खडकवासला परिसरातील डोणजे गावात घडली. त्यानंतर तरुणाचा मृतदेह नाल्यात टाकून पसार झालेल्या ६ आरोपींनी हवेली पोलिसांनी अटक केली.

खूनातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार – सविस्तर बातमी  

विशाल चव्हाण (रा. कोल्हेवाडी, खडकवासला, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. ‘खडकवासला परिसरातील डाेणजे गावातील नाल्यात चव्हाणचा मृतदेह पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली नव्हती. समाज माध्यमात मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे छायाचित्र पोलिसांनी प्रसारित केले.

चव्हाण याच्या कुटुंबीयांनी ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करुन सहा जणांना अटक केली, तसेच खून प्रकरणात नांदेड सिटी पोलिसांनी तिघांना अटक केली’, अशी माहिती हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी दिली. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. तेव्हा चव्हाण मंगळवारी (१३ जानेवारी) रात्री खडकवासला परिसरातील डोणजे गावात मित्राच्या घरी जेवण करण्यासाठी गेला होता. रात्री साडेअकरापर्यंत चव्हाण घरी परतला नाही. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी मोबाइलवर संपर्क साधला. चव्हाणने प्रतिसाद दिला नाही. चव्हाण याचा जेवण करताना मित्रांबरोबर वाद झाला. वादातून मित्रांनी चव्हाण डोक्यात देशी बनावटीच्या पिस्तुलातून गाेळी झाडून खून केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×