Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Veer Baburao Shedmake History : आदिवासींचा स्वाभिमान वीर बाबुराव शेडमाके – डॉ.अशोक उईके, आदिवासी विकास, मंत्री

Veer Baburao Shedmake History

जल-जंगल-जमिनीच्या हक्कांसाठी इंग्रजांशी दिला लढा; वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी देशासाठी दिले बलिदान

marathinews24.com

पुणे – Veer Baburao Shedmake History : आदिवासी समाजासाठी अभिमान, आत्मसन्मान आणि हक्कांचे प्रतीक मानले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे वीर बाबूराव शेडमाके. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे गोंडवाना क्षेत्रातील (सध्याचा चंद्रपूर-गडचिरोली परिसर) एक महान आदिवासी स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख आहे. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता इंग्रजाच्या अन्यायाने, त्यांच्या जुलूमशाहीने संपूर्ण भारतीय समाज त्रस्त झाला होता. अशा परिस्थितीमध्ये आदिवासी समाजही आपल्या हाल-अपेष्टा, गरीबी, दारिद्र्य या सगळ्या भस्मासुरामध्ये भरडला जात होता. शिवाय इंग्रजांच्या दबावाखाली अन्याय सहन करून जीवन व्यथित करत होता. इंग्रजांच्या विरुद्ध जाऊन बोलण्याची कोणीही हिम्मत करत नव्हते. मग त्यांच्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे तर फार दूर होते. अशा परिस्थितीमध्ये आदिवासी समाजातून कोणी आवाज उठवणे म्हणजे हा एक चमत्कार किंवा दैवीरूप असलेला पुरुषच करेल अशी अवस्था होती. अशा परिस्थितीमध्ये वीर बाबुराव शेडमाके हे आदिवासींचे नेतृत्व करून आदिवासींवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पुढे आलेल एक नाव होत.

भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त विशेष लेख – सविस्तर वाचा 

आदिवासी समाजामध्ये जन्मलेला वीर पुरुष पहिल्यांदा लोकांच्या समोर आला. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी वीर बाबुरावजी शेडमाकेनी आपली वज्रमूठ आवळली. आपल्या जीवाची पर्वा न करता आदिवासीवरील होणारा अन्याय आपणच थांबवला पाहिजे. यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन आदिवासी समाज रानावनात, डोंगरदऱ्यात, जंगलामध्ये राहून आपले जीवन व्यतीत करत होता. अशा समाजाला भयमुक्त करण्यासाठी, त्या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्या समाजाला पुढे येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वीर बाबुराव शेडमाके या आदिवासीच्या लढवय्या महान योद्धाने आदिवासींमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम केलं.

वीर बाबूराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील किश्तपुर मोलमपल्ली या गावी झाला. वडिल पुल्लेसुर बापू आणि आई जुर्जाकुंवर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थिती असतांनाही त्यांनी रायपूर येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. आणि जेव्हा इंग्रजाचा जुलूम वाढू लागला. तेव्हा आपले शिक्षण थांबवून परिस्थितीनरुप आदिवासींच्या पारंपारिक ‘गोटूल’ या प्रशिक्षण देणाऱ्या व्यवस्थेत प्रवेश घेतला. आणि तेथून मग युद्धकलेचे त्यात धनुष्यबाण, तलवारबाजी आणि गनिमी कावा याचे प्रशिक्षण घेतले. दिवसेंदिवस इंग्रजी शासन व्यवस्थेचा जुलूम वाढतच गेला. त्यात आदिवासी समाज पार भरडला जात होता.

इंग्रजांचे शोषण वाढतच चालले होते. त्यांच्या जुलूमशाहीने सगळा समाज त्रस्त झाला होता. भारतामध्ये संपूर्ण समाजामधून एक रोष व्यक्त होत होता. त्यात आदिवासी समाजावर चालवलेला अन्याय-अत्याचार आणि जुलूम हा तर अगदी पराकोटीला गेलेला होता. (Veer Baburao Shedmake History)  अशा परिस्थितीत आदिवासी समाजातून वीर बाबुराव शेडमाके यांच्या रूपाने उठावाची ठिणगी पेटली. आणि ती ठिणगी एक ज्वाला होऊन इंग्रजी सत्तेच्या विरूढ मोठा लढा उभा केला. जेव्हा १८५७ मध्ये संपूर्ण भारतामध्ये इंग्रजाविरुद्ध असंतोष निर्माण होवून, सगळीकडून उठाव निर्माण झाला. त्यावेळेस वीर बाबुराव शेडमाके हे २४ वर्षांचे तडफदार एक सळसळते रक्त होते. या जुलूमशाहीला मोडीत काढण्यासाठी त्यांनी विरोध करायला सुरवात केली. १८५७ मध्ये जेव्हा संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध उठाव सुरू झाला. तेव्हा वीर बाबूराव शेडमाके यांनी चंद्रपूर (चांदागड) जिल्ह्यात आदिवासींना एकत्र केले. आदिवासी समाजातील तरुणांना एकत्र करून अन्यायाची जाणीव करून दिली. आणि त्यांना इंग्रजी जुलूमशाही विरूढ लढण्यासाठी तयार केले. त्यांनी २४ सप्टेंबर १८५७ रोजी ‘जंगोम सेना’ स्थापन केली. या जंगोम सेनेत तरुणांना सामील होण्यास प्रवृत्त केले. त्यांचे एकच ध्येय इंग्रजाचा बीमोड करणे. जंगोम सेनेत ५०० सैनिकांची तुकडी तयार करून त्यांना युद्धाचे प्रशिक्षण देवून तयार केले. या सेनेत केवळ आदिवासी युवकच नव्हते, तर रोहिले आणि इतर समाजाचे युवकही मोठ्या प्रमाणात सामील होते.

जंगोम सेनेच्या माध्यमातून वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध विविध लढाया करून त्यांना सळो की पळो केले. भारतीय समाजावर चालवलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या जिवाची पर्वा कधीच केली नाही. त्यांनी इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या राजगड किल्ल्यावर ७ मार्च १८५८ रोजी हल्ला केला. त्या लढाईत इंग्रज सैनिकांना पळवून तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या घटनेनंतर इंग्रज कॅप्टन क्रिक्टन यांनी मोठ्या संख्येने इंग्रजी फौज पाठवली. पण त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वीर बाबूराव शेडमाके तयारच होते. त्यांनी आपल्या जंगोम सेनेला लढण्यास प्रवृत्त केले. जंगोम सेनेनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालून आलेल्या इंग्रज सैनिकांचा १३ मार्च १८५८ रोजी नांदगाव घोसरीच्या जंगलात पराभव केला. हा पराभव इंग्रजांचा नामोहरण करणारा ठरला. म्हणून इतर इंग्रज अधिकारी वेगवेगळ्या तुकड्याच्या माध्यमातून जंगोम सेनेला पराभूत करण्यासाठी आणि वीर बाबुराव शेडमाके यांना पकडून फाशीची शिक्षा करण्यासाठी सरसावले. वैनगंगा नदीच्या खोऱ्यात इंग्रज अधिकारी ‘गार्टले’ आणि ‘हॉल’ यांच्या तुकड्यांना चिमूर आणि घोट येथे जंगोम सेनेने गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले.

वीर बाबुराव शेडमाके यांचा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता. तो मागासलेल्या अत्याचाराच्या ओझ्याखाली झुकलेल्या आदिवासी सामाजाच्या अस्तित्वाचा लढा होता. इंग्रजांनी बनवलेल्या जुलमी जंगल कायद्यांमुळे आदिवासींचे जंगलातील अधिकार हिरावले जात होते. जंगोम सेनेने आदिवासींच्या ‘जल-जंगल-जमीन’ या नैसर्गिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी उठवलेला लढा होता. (Veer Baburao Shedmake History) इंग्रजांच्या जुलमी कराविरुद्ध उचललेला सामाजिक उठाव होता. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. हा त्यांचा विचार आजच्या समाजात रुजणे गरजेचे आहे. समाजात त्यांच्या विचाराची पेरणी होणे गरजेचे आहे.

प्रत्येक वेळी वीर बाबुराव शेडमाके यांनी आणि त्यांच्या जंगोम सेनेपुढे इंग्रज सैनिक पराभूत होत होते. जंगोम सेनेची युद्धनीती ही जंगलात, नदीच्या परिसरात वेगवेगळ्या मार्गाने धूळ चारत होती. वीर बाबुराव यांना समोरासमोरील युद्धात पराभूत करणे इंग्रजांना अशक्य झाले होते. इंग्रजांनी शेवटी फितुरीचा मार्ग निवडला. पैशाला विकले जाणारे व्यक्ती शोधू लागले. त्याच उद्देशाने इंग्रज अधिकारी कॅप्टन क्रिक्टन याने त्यांच्यावर १,००० रुपयांचे बक्षीस ठेवले. अखेर अंतर्गत फितुरीतून त्यांचा घात झाला. अहेरीच्या तत्कालीन जमीनदार राणी लक्ष्मीबाई इंग्रजाच्या मोहाला बळी पडल्या. त्यांनी विश्वासघात करून फितुरीने १८ सप्टेंबर १८५८ रोजी वीर बाबूराव शेडमाके यांना भोपाळ पट्टणम येथून अटक करण्यात आली.

समाजाच्या हितासाठी अविरत लढा देणाऱ्या वीर महापुरुषास समाजातीलच लालची, फितूर लोकांकडूनच घात झाला. त्यांची चूक एकच झाली की, त्यांनी लोकांच्या समस्यासाठी लढताना लोकांवर उदार मनाने विश्वास ठेवला. त्यांच्या त्या अंध विश्वासाने लोकांकडूनच घात झाला. त्यांना साखळदंडात बांधून चंद्रपूरच्या तुरुंगात आणण्यात आले. भारतीय लोकांना एकजूट करून इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून इंग्रजांच्या विशेष न्यायालयाने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवला. त्यांना भीती निर्माण झाली होती की, वीर बाबुराव शेडमाके यांना आपण जर जीवंत सोडले तर लोक हळूहळू विद्रोह करायला लागतील. शेवटी आपली सत्ता पोकळ करून पूर्णपणे ढासळेल. हे जर थांबवायचे असेल तर त्यांना खुलेआम फाशी द्यावी लागेल. असे केल्याने लोक परत इंग्रज सत्तेविरुद्ध विद्रोहाची हिम्मत करणार नाहीत. अखेर २१ ऑक्टोबर १८५८ रोजी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या बाहेरील एका पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी देण्यात आली.

आदिवासी समाजातील धगधगती आग शमवण्यास अखेर इंग्रज सरकारला यश आले. वंचिताची हिम्मत, निराधारांचा आधार, शोषितांचा आवाज, जुलमी यांचा कर्दनकाळ, इंग्रजांना स्वप्नातही भयभीत करणारा त्यांचा काळ आणि अन्यायाच्या विरोधात धगधगणारी मशाल अखेर विझली. पण आजही क्रांतिवीर बाबूराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या कार्याचा परधान आणि गोंड संस्कृतीशी जोडलेल्या लोकगीतांमध्ये उल्लेख अत्यंत आदराने केला जातो. (Veer Baburao Shedmake History) त्यांच्या शौर्यामुळे आदिवासी समाजाने त्यांना ‘वीर’ ही पदवी दिली. भारत सरकारनेही त्यांच्या शौर्याची दाखल घेवून १२ मार्च २००९ रोजी वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक विशेष टपाल तिकीट जारी केले. चंद्रपूर जिल्ह्याच्या तुरुंगासमोरील ज्या पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी दिली गेली. त्या ठिकाणी आजही पवित्र शहीद स्मारक म्हणून दरवर्षी १२ मार्च (जयंती) आणि २१ ऑक्टोबर (शहीद दिन) रोजी संपूर्ण आदिवासी बांधव एकत्र येऊन त्यांना आदरांजली वाहतात. परधान समाजातील लोकगीतांच्या माध्यमातून आजही वीर बाबूराव शेडमाके आणि जंगोम सेनेचा इतिहास पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×