Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाई

गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाई

आर्म ऍक्टनुसार खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाई – गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून ४० हजारांचे गावठी पिस्तूल आणि सहा हजारांची ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जितु रवि मंडलिक (वय २०, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात आर्म ऍक्टनुसार खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळला – सविस्तर बातमी 

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेचे युनिट एकचे पथक हद्दीत २९ जुलैला पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी भवानी पेठत विनापरवाना गावठी पिस्तूल आणि काडतुसे बाळगलेल्या आरोपीची माहिती पोलीस अनिकेत बाबर यांना मिळाली. तो कोणत्यातरी गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मटण मार्केटजवळील जुन्या मोटर स्टँड भागात आरोपी जितू मंडलिक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, काडतुसे जप्त केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, एपीआय दिपक बर्गे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, निलेश साबळे, शुभम देसाई, उमेश मठपती यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×