Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Vishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावर

Vishrantwadi Crime

विश्रांतवाडीत अल्पवयीनांसह टोळक्याचा राडा

marathinews24.com

पुणे – Vishrantwadi Crime : पान टपरीसमोर उभी केलेली दुचाकी बाजूला लावण्यास सांगितल्याचा राग आल्यामुळे अल्पवयीनांसह टोळक्याने व्यावसायिकासह त्याच्या वडिलांना शिवीगाळ केली. हातातील धारदार शस्त्रे हवेत फिरवून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. तसेच एकाच्या घरावर शस्त्र मारुन नुकसान केल्याची घटना ५ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास विश्रांतवाडीतील भीमनगरात घडली आहे. याप्रकरणी तिघा अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौघांचा शोध घेतला जात आहे.

मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विश्रांतवाडीत राहायला असून, त्यांची पानटपरी आहे. ५ ऑक्टोबरला अल्पवयीनांनी त्यांची दुचाकी पानटपरीसमोर उभी केली होती. त्यामुळे संबंधित तरुणाने त्यांना दुचाकी बाजूला लावण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तक्रारदारासह त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. Vishrantwadi Crime हातातील शस्त्रे हवेत फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यासोबतच तक्रारदाराच्या घराशेजारी राहणार्‍या एकाच्या घरावर शस्त्र मारुन नुकसान केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×