Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

खराडीत ११ लाखांच्या घड्याळांची चोरी

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुकानाच्या खिडकीचे ग्रील कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करीत तब्बल ११ लाख ७ हजार रूपये किंमतीच्या घड्याळांची चोरी केली आहे. ही घटना ९ ते १० नोव्हेंबरला खराडीतील तुळजाभवानी नगरातील शॉपनंबर दोनमध्ये घडली आहे. याप्रकरणी एकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

इमारतीतून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे खराडीतील तुळजाभवानी परिसरात घड्याळ विक्रीचे दुकान आहे. ९ ते १० नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या खिडकीचे ग्रील कापले. आतमध्ये प्रवेश करीत विविध कंपनीचे ११ लाख ८ हजारांची घड्याळे चोरून नेली. दुसर्‍या दिवशी तक्रारदार जेव्हा दुकान उघडण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.

टास्कच्या बहाण्याने ८ लाखांचा ऑनलाईन गंडा

पुणे – टेलीग्राम अ‍ॅपद्वारे फोन करून टास्क देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एकाला ऑनलाईनरित्या तब्बल ८ लाख २४ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना १६ ते २० जून कालावधीत सोमवार पेठेत घडली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोमवार पेठेत राहायला असून, १६ जूनला सायबर चोरट्यांनी त्यांना टेलीग्रामद्वारे फोन केला. हॉटेलचे रिव्ह्यू देण्यासह टास्कचे काम देण्याची बतावणी केली. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तब्बल ८ लाख २४ हजारांची गुंतवणूक करूनही त्यांना काम मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×