Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरबोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूकनुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ; कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कारलष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेतडीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यूबुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’वाहनांची तोडफोड करणारा गजाआडविवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपाससंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनअर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

बजाज पुणे ग्रँड टूरचे नेटके आयोजन: जागतिक सायकलिस्टच्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया

बजाज पुणे ग्रँड टूरचे नेटके आयोजन: जागतिक सायकलिस्टच्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया

विविध देशांतून आलेल्या सायकलस्वारांनी दिल्या प्रतिक्रिया

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन अतिशय चोख, नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीने केले आहे असे मत विविध देशांतून आलेल्या सायकलस्वारांनी व्यक्त केले आहे. रस्त्यांची गुणवत्ता, शर्यतीचे मार्ग, भोजन व्यवस्था तसेच पुणेकरांनी प्रेमळ मनाने केलेले स्वागत यामुळे खेळाडू भारावून गेले असून, स्पर्धेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यानंतर विविध देशांतील सायकलस्वारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : प्रोलॉग स्पर्धेने दाखवून दिली भव्यतेची चुणूक – सविस्तर बातमी 

​हेडन जेम्स (ऑस्ट्रेलिया – टीम नेक्स्ट वेलोफिट)

मी ‘नेक्स्ट वेलोफिट’ (Next Velofit) संघाचे प्रतिनिधित्व करतोय. इथे पुण्यात येऊन मला खूप आनंद झाला आहे. स्पर्धेचे नियोजन अतिशय चोख आणि उत्तम आहे. आता प्रत्यक्ष शर्यतीसाठी मी खूप उत्सुक आहे. आम्ही काल पहिल्या टप्प्यातील मार्गाची पाहणी केली. येथील रस्ते सायकलिंगसाठी अगदी योग्य आहेत. आमची राहण्याची व्यवस्था आणि इथले जेवणही उत्तम आहे. लोक खूप प्रेमळ आहेत.

​तावी कन्निमे (एस्टोनिया – क्विक प्रो टीम)

मी एस्टोनियाहून आलो असून ‘क्विक प्रो’ (Quick Pro) संघाचा भाग आहे. मला येथील निसर्ग, ट्रॅक आणि एकूणच वातावरण खूप आवडले आहे. ही स्पर्धा आणि येथील उत्साह खरोखरच अप्रतिम आहे. मी नुकताच व्यावसायिक (Pro) सायकलस्वार झालो आहे आणि माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच भारतात येऊन अशा मोठ्या स्पर्धेत भाग घेताना मला खूप अभिमान वाटतोय. पुण्यातील लोकांचे स्वागत पाहून मी भारावून गेलो आहे. प्रत्येकजण आमचा उत्साह वाढवत आहे, हे पाहून खूप छान वाटते.

​जॉन (ऑस्ट्रेलिया)

​”येथील रस्ते सायकल चालवण्यासाठी खूप चांगले, गुळगुळीत आणि वेगवान आहेत. आजचा मार्ग चांगला होता, पण उद्या काही कठीण चढाव (climb) आहेत, ज्यासाठी आम्ही तयार आहोत. पुण्यातील प्रेक्षकांचा प्रतिसादही थक्क करणारा आहे.

​की झे यी (मलेशिया – टीएसजी शिमानो तेरेन्गानू)

​”नमस्ते, मी मलेशियाचा की झे यी आहे. भारतात येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. येथील लोक खूप मनमिळावू आणि खिलाडू वृत्तीचे आहेत. शर्यतीचा मार्ग (Race Route) अतिशय उत्तम आहे. रस्त्यांची स्थिती सायकलिंगसाठी पोषक आहे. मी तर म्हणेन की प्रत्येकाने सुट्टी घालवण्यासाठी एकदा तरी भारतात नक्कीच यावे!”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×