Breking News
Pune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालतPune Police Crime News : दारुच्या नशेत पुणे पोलीस आयुक्ताच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्नAhilyadevi Holkar Karj Mukti Yojana : कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमाPune Viman Nagar Drug Seizure : पुण्यात कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानातून ई-सिगारेट, हुक्का अन् गांजाची विक्रीPune Police News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध केला गर्भपात, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Wildlife Conservation Baramati : सर्प, पक्षी व वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Wildlife Conservation Baramati : सर्प, पक्षी व वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वनविभाग बारामती व बचाव पथकाच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाची सांगता

marathinews24.com

बारामती – Wildlife Conservation Baramati : वनविभाग व बचाव पथक बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाच्या सांगता समारंभाचे आयोजन सुपे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्प, पक्षी व इतर वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पुण्यात रंगणार ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाच्या प्रारंभी रेस्क्यू पथकाचे श्रेयस कांबळे यांनी ‘वन्यजीव सहजीवन व वन्यजीव संरक्षण’ या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. Wildlife Conservation Baramati सर्पांच्या विविध जाती, सर्पदंशाबाबत घ्यावयाची काळजी, पक्षी व त्यांच्या पिलांची निगा, तसेच जखमी किंवा निराधार वन्यप्राण्यांना आढळल्यास करावयाची कृती याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. वन्यजीव बचाव प्रक्रियेची माहितीही देण्यात आली.

वन्यजीवांबाबतचे गैरसमज दूर करून मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहजीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. यावेळी वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित निबंधलेखन व चित्रकला स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. (Wildlife Conservation Baramati) वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे व श्रीमती शीतल फुंदे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात शाळेतील एकूण २६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल, सुपे येथील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन, सर्प व इतर वन्यप्राण्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि मानव-वन्यजीव सहजीवनाची भावना रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वनरक्षक, वनसेवक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×