Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेची फसवणूक

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून एका महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. प्रतिक संजय देवरे (वय ३८, रा. जिजामाता चौक, बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवरे याची विवाहविषयक संकेतस्थळावरुन एका महिलेची ओळख झाली होती. देवरेने महिलेला शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने महिलेकडून त्याने वेळाेवेळी सात लाख २० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने महिलेला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी विवाहविषयक संकेतस्थळावरुन एका डाॅक्टर तरुणीची फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक झाल्याने तरुणीला धक्का बसला. तिने बिबवेवाडी भागातील एका दवाखान्यात विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केली हाेती. याप्रकरणी सांगलीतील एका डाॅक्टरला अटक करण्यात आली होती. डाॅक्टरचा विवाह झाला होता. मात्र, ही बाब त्याने डाॅक्टर तरुणीपासून लपवून ठेवली होती. त्याने तिच्याकडून वेळोवेळी पैसेही घेतले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×