छळामुळे महिलेची आत्महत्या; पतीसह चौघे अटकेत

प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

हुंडा व चारित्र्यावर संशयातून छळ केल्याचा आरोप

marathinews24.com

पुणे – सासरकडील छळामुळे महिलेने आत्महत्या केल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पती, सासू, सासरे, तसेच नणंदेला अटक करण्यात आली.

तरुणीला धमकावून बलात्कार करणारा अटकेत – सविस्तर बातमी

या प्रकरणी पती, सागर चंद्रकांत शेडगे, सासू कमल, सासरे चंद्रकांत, (तिघे रा. स्वामीकृपा बिल्डिंग, आंबेगाव पठार, धनकवडी) तसेच नणंद सारिका हर्षल वाल्हेकर (वय ३३, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) यांना अटक करण्यात आली. याबाबत महिलेच्या भावाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या बहिणीचा आरोपी सागर शेडगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर महिलेचा छळ सुुरू करण्यात आला. विवाहात मानपान केला नाही, तसेच हुंड्यात वस्तू दिल्या नाहीत, असे टोमणे मारण्यात आले. पतीने महिलेच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ केला. छळामुळे बहिणीने १७ जानेवारी रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका निकम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×