Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

खराडीसह विमाननगरमध्ये महिलांचे दागिने हिसकावले

खराडीसह विमाननगरमध्ये महिलांचे दागिने हिसकावले

दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस सुरूच

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी धुडगूस घातला असून, पादचारी महिलांना लक्ष्य करीत दागिने हिसकावले जात आहेत. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा अटकाव करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरटे दिवसाढवळ्याही महिलांना टारगेट करीत लुट करीत आहेत. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या महिलांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ९२ लाखांची केली फसवणूक – सविस्तर बातमी 

रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पावणेतीन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना खराडी भागात घडली. याबाबत महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५६ वर्षीय महिला चंदननगर भागात राहायला आहेत. शनिवारी (दि. २४) रात्री जेवण करुन रात्री सव्वादहाच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी खराडी रस्त्यावरील साईकृष्णा हॉटेलसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी खराडी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले तपास करत आहेत.

विमाननगरमध्ये भरदिवसा महिलेचे दागिने हिसकावले

रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना रविवारी (दि.२५) विमाननगर भागात घडली. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला विमाननगर भागात राहायला असून, रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास लुंकड क्लासिक सोसायटीसमोर रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील २ लाख ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×