पूर्वसूचना न देता काम; सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी

पूर्वसूचना न देता काम; सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी

वाहन चालकांना नाहक मनस्तापाला जावे लागले सामोरे 

marathinews24.com

पुणे – महापालिकेकडून पुर्व सूचना न देता अचानक विश्रांतीनगर येथील प्रकाश इनामदार चौकातून (विठ्ठलवाडी चौक) उजवीकडून वळण घेण्यास मनाई करण्यात आल्याने मंगळवारी सिंहगड रस्ता परिसरात कोंडी झाले. पावसामुळे वाहतूक संथ झाल्याने अचानक वळण बंद करण्यात आली. त्यामुळे वाहन चालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मंगळवारी सकाळी अनेक जण कोंडीत अडकल्याने कामावर पोहचण्यास उशीर झाला. सकाळपासून पाऊस सुरू असल्याने वाहतूक संथ झाली होती. कॅनाॅल रस्त्याने वाहनचालक इनामदार चौकात आले. तेव्हा महापालिकेच्या ठेकेदाराने कामानिमित्त उजवीकडे वळण घेणयास मनाई केली. त्यामुळे या भागात मोटी कोंडी झाली.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोखा – सविस्तर बातमी 

वाहनचालकांना कोंडीत अडकून पडावे लागले. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाड्या, तसेच नोकरदार कोंडीत अडकून पडले. वाहनचालकांना वळसा घ्यावा लागला. वळसा घेतल्यानंतर स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कोंडीतून वाट काढावी लागली. वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका ज्योती गोसावी, माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, महापालिकेचे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पाटील, सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी तेथे भेट दिली. ‘महापालिकेने कोणतीही पूर्वकल्पना न देता उजवीकडे वळण्यास मनाई केल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. विनंती केल्यानंतर काम बंद करण्यात आले. त्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम पालिकेकडून चुकीच्या पद्धतीने झाले आहे. पूलावरील वाहतूक पुढे उतरविणे अपेक्षित होते’, असे ज्योती गोसावी यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×