Breking News
मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआडपुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छादट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यूमंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादतब्बल ५ महिलांनी घेतला-बांगड्या अन मेहंदीचा आनंदस्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वनपुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करापार्टीत ड्रग्जचा पुरवठा करणार्‍यांचा शोध सुरूतीन मित्रांच्या भोवतीचा पौर्णिमेचा फेरा उलगडणार की अजून गुंता वाढणार, ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २’ प्रदर्शित

उधारीवर दारू न दिल्याने कामगाराला बदडले

येरवडा पोलिसांकडून एकाला अटक

marathinews24.com

पुणे – उधारीवर दारू न दिल्याने वाईन शाॅपमधील कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. रोहित पिल्ले (वय २५, रा. जयजवानगर, लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. श्रीकांत तानाजी राजगुरु (वय ३८, रा. आझाद आळी, येरवडा गावठाण) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिल्ले याने केलेल्या मारहाणीत वाईन शाॅपमधील कामगार करण संतोष आहुजा (वय २८) हे जखमी झाले आहेत.

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील वाईन शाॅपमध्ये पिल्ले रविवारी (१५ जून) रात्री नऊच्या सुमारास आला. त्याने उधारीवर दारूची बाटली मागितली. वाईन शाॅपमधील कामगार आहुजा याने दारू देण्यास नकार दिल्याने पिल्ले चिडला. त्याने दुकानातील गल्ल्याजवळील काच फोडली. आहुजा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत आहुजा यांचा दात पडला. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पिल्ले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top