Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

SC-ST अत्याचार प्रतिबंध कायद्यासाठी 25 जुलैला कार्यशाळा

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे 25 जुलै रोजी आयोजन

marathinews24.com

पुणे – अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळचे बहुउद्देशिय सभागृह पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्यावतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन – सविस्तर बातमी

या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये महसूल व वन विभागातील उपविभागीय अधिकारी (प्रांत), तथा अध्यक्ष उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती, गृह विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच पोलीस विभागाकडे असलेला नागरी हक्क संरक्षण शाखेतील अधिकारी-कर्मचारी तथा सदस्य, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आणि उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती, सामाजिक न्याय विभागातील संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण तथा सदस्य सचिव, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती व संबंधित योजनेचे कामकाज पाहणारे अधिकारी-कर्मचारी व विधी व न्याय विभागातील सरकारी अभियोक्ता तथा सदस्य, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आणि उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती तसेच ग्रामविकास विभागातील गटविकास अधिकारी (बीडीओ) तथा सदस्य सचिव, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती इत्यादींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तरी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणेबाबत विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांनी आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×