Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

पुण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार

वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

विमानगरमधील टाटा गार्डरूम बसस्थानकाजवळ घडली घटना

marathinews24.com

पुणे – डंपर चालकाने पाठीमागून धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरूण ठार झाला आहे. हा अपघात ९ नोव्हेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास विमानगरमधील टाटा गार्डरूम बसस्थानकाजवळ घडला आहे. सचिन वसंत धुमाळ (वय २८ रा. मल्हारनगर, वडगाव शेरी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याचा मित्र स्वप्नील माने (वय २५ रा. सोमनाथनगर) यांनी विमातनळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

एसटीत शिरताना जेष्ठेचे मंंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सचिन आणि त्याचा मित्र स्वप्नील हे ९ नोव्हेंबरला रात्री सव्वा बाराच्या सुमारास दुचाकीवरून टाटा गार्डरूम बसस्थानक परिसरातून प्रवास करीत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपर चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडल्यामुळे जखमी झाले. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सचिन धुमाळ याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.

लोणी काळभोरमध्ये वाहनाच्या धडकेत जेष्ठ नागरिक ठार

भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत जेष्ठ नागरिक पादचारी गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा अपघात २ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास लोणी काळभोरमधील माळीमळा परिसरात घडला होता. शिवाजी भानुदास वैरागे (वय ६२ रा. माळीमळा, लोणी काळभोर ) असे ठार झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी विजय वैरागे (वय ३९ रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×